संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

पुन्हा ‘ते’ नाही, आता येणार शिंदेशाही! एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशी चर्चा असतानाच एक मोठा ट्विस्ट आला आहे. आता देवेंद्र फडणवीस नाही तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता ते नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे, असे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे ऐकले नाही. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन सरकार स्थापन केले. या अडीच वर्षाच्या काळात प्रगती झाली नाही. मविआसोबत जाण्याच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami