पुणे- राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत, यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. पुण्यात शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत,’उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनरवर लिहून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात सदर बॅनर झळकवण्यात आले आहेत.बाळासाहेबांची युवा सेना पुणे शहरच्यावतीने पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यासोबतच डोंबिवलीत देखील शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सदर बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस या प्रकल्पात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय होती आणि हे प्रकल्प महाराष्ट्रातून कोणत्या इतर राज्यात आणि कोणत्या वर्षी गेले हे सविस्तरपणे लिहिण्यात आले आहे.