संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

पुण्याला जोरदार पावसाने झोडपले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- आज सायंकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपून काढले. पुण्यातील किरकटवाडी व खडकवासला या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हेवाडी व शिवनगर भागात अनेक नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये पाणी शिरले. खडकवासला गावच्या कोल्हेवाडी व किरकटवाडी गावच्या शिवनगर या भागाला मागील काही वर्षांपासून सातत्याने पुराचा व रस्त्यावरुन वाहणार्‍या पाण्याचा सामना करावा लागत आहे. पाऊस आला की सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील डोंगर भागातील पूर्ण पाणी रस्त्यावरुन वाहते. पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ते पाणी थेट मुख्य सिंहगड रस्त्याकडे वाहत येते. रस्त्यावरुन वाहणारे पाणी व गाळ दोन्ही बाजूंना असलेल्या घरांमध्ये व दुकानांत शिरत असल्याने नागरिकांना सातत्याने मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami