संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

पुण्यात वन महोत्सव सुरू
2 लाख झाडे लावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे वनविभागाकडून वन महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा केला जातो. वनमहोत्सवाच्या माध्यमातून लोकामध्ये वृक्ष लागवड व जंगल वाचवणे याविषयी जनजागृती निर्माण केली जाते. वनमहोत्सवाचे औचित्य साधून आज पुणे वन विभाग मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण व पुणे वन विभागाचे उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते मॅफको गार्डन, गोखले नगर येथे वृक्षारोपन करून वन महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस सिमेंटची जंगल वाढत आहेत. वाहनातून निघणार्‍या कार्बन डायऑक्साइडची भर पडत आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे वन विभागाच्या वतीने पुणे शहरात साधारणपणे 50 हजार वृक्ष तसेच विविध वनपरिक्षेत्रात सुमारे 2 लाख वृक्ष लागवड करण्याचे पुणे वनविभागाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी यावेळी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami