पुणे – शहरातील बाईक टॅक्सी विरोधात आरटीओ विभागाने कारवाई करावी, बाईक टॅक्सीचे अॅप बंद करावे या मागण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला होता. या बंदमध्ये 12 पेक्षा जास्त रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या.आता पुन्हा येत्या 12 डिसेंबर पासून पुन्हा बंद आंदोलन सुरू होणार आहे.
‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे की,गेल्या वेळी प्रशासनाच्या आश्वासनानंतर रिक्षा बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले होते . 11 डिसेंबर पूर्वी बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. नागरीकांची गैरसोय लक्षात घेता आम्ही गेल्या वेळी आंदोलन स्थगित केले. पाच दिवस झाल्यानंतर सुद्धा आजतागायत समिती स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. यावेळी नागरिकांची गैरसोय झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भ्रष्ट अधिकाऱ्यांची असेल असा इशारा संघटनेने दिला आहे.