संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुण्यात भाजप आमदार कांबळेंची आनंदनगर झोपडपट्टीत दमदाटी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – भाजपचे आमदार सुनील कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह मार्केट यार्ड परिसरातील आनंद नगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासगी बांधकाम व्यवसायिकाच्या फायद्यासाठी आमदार कांबळे रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा आरोप व्हिडिओ केला जात आहे. त्यांच्यासोबतची एक व्यक्ती हातोडा घेऊन मारण्यासाठी नागरिकांच्या मागे धावताना व्हिडिओत दिसते. त्यामुळे झोपडीवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्याच्या कँटोन्मेंट मतदार संघातील भाजपचे आमदार सुनील कांबळे मार्केट यार्डच्या आनंदनगर झोपडपट्टीत नागरिकांना दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यासाठी नागरिकांना तेथून हकलण्याचा प्रयत्न आमदार कांबळे आणि त्यांचे साथीदार करत आहेत. आनंद नगरच्या नागरिकांना दमदाटी आणि शिवीगाळ करताना ते व्हिडिओ दिसतात. त्यांच्यासोबतची एक व्यक्ती हातात लोखंडी हातोडा घेऊन मारण्यासाठी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या मागे धावताना दिसते. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीत आमदार सुनील कांबळे यांची दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी झोपडपट्टीतील नागरिकांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात आमदारांच्या विरोधात तक्रार घेतली जाणार नाही. म्हणून झोपडपट्टीतील रहिवाशांनी आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार केली. आमदार कांबळे यांचा यापूर्वीही गुंडगिरीचा प्रताप उघड झाला होता. त्यांनी पालिकेतील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र आता आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी केल्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami