पुणे:- धुळवडीला मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर गोळीबार करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील साथीदारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. दरम्यान, हाणामारीत पिस्तुलातून गोळीबार झाला, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण तयार झाले होते.