संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

पुण्यात जपानी मेंदूज्वराचा आढळला पहिला रुग्ण !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पुण्यात आता जपनी मेंदूज्वराचा रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. एका ४ वर्षाच्या मुलाला या आजाराची बाधा झाली आहे.सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पुणे पालिका क्षेत्रात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्यामुळे त्याला रोखण्यासाठी पलिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.
वडगाव शेरी परिसरातील चार वर्षाच्या मुलाला जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजेच जपानी मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आहे.हा विषाणूजन्य आजार आहे. या मुलाला ३ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डोकेदुखी, अशक्तपणा आणि फिट येणे ही लक्षणे दिसून येत होती. त्यानुसार रुग्णालयात विविध तपासण्या केल्या. तसेच नियमित उपचारही सुरु ठेवण्यात आले. मुलाच्या रक्ताचे तसेच मणक्यातील पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवण्यात आले होते. या संस्थेने २९ नोव्हेंबर रोजी रुग्णाचा अहवाल ससूनला दिला.त्यामध्ये त्याला जपानी मेंदूज्वर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. या मुलाला सलग ९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.तसेच त्याची आवश्यक औषधेही चालू करण्यात आली.१७ दिवसांच्या अतिदक्षता विभागातील उपचारानंतर मुलाला सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हा आजार साधारणपणे १५ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये आढळून येतो. क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे हा आजार पसरतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami