पुणे – पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससी तांत्रिक सेवेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा बुधवारी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. याआधी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी राज्य सेवा परीक्षेची नवी पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे तांत्रिक विद्यार्थ्यांनी तांत्रिक सेवेच्या मुख्य परीक्षेची नवी पद्धत 2025 पासून लागू करण्याच्या मागणी केली. आयोगाने घाईघाईने नवी पद्धती अंमलात आणू नये. तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने पुस्तके उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.