संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पुण्यातील सोसायटीच्या पार्किंगमधीलसहा वाहनांना मध्यरात्री आग लावली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – शहरातील नर्‍हे परिसरातील एका सोसायटीच्या तळमजल्या वरील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सहा वाहनांना आग  लावल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली होती.या आगीत चार दुचाकी तसेच दोन मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोनजणांना ताब्यात घेतले.

नर्‍हे भागातील हरिहरेश्वर पार्क सोसायटीत पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली.अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, पांगारे, भरत गोगावले, नलावडे आदींनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आग लावणार्‍या विशाल श्रीमंत मिसाळ याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले. सोसायटीच्या गणेशोत्सवात आणलेल्या आर्केस्ट्राच्या कारणातून एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.याबाबत अमोल अशोक भिसे (३९) रा. हरीहरेश्वर सोसायटी यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला मिसाळ कॅमेर्‍यात कैद झाल्याने या प्रकरणीचा लगेच उलगडा झाला.मिसाळ याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami