संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

पुण्यातील दोन जवानांचा गडचिरोलीत एकमेकांवर गोळ्या झाडून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुण्याहून बंदोबस्तासाठी गडचिरोलीत गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून त्यामध्ये हे दोन्ही जवान जागीच ठार झाले आहेत. गडचिरोली येथील मरपल्ली या गावात हा प्रकार घडला आहे. श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी गोळीबारात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

हे दोघेही पुण्याचे आहेत. ही घटना दुपारी ४च्या सुमारास घडली. पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे हे दोघे जवान तैनात होते. दोघांच्या वैयक्तिक वादातून भांडण सुरू झाले. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांनीही एकमेकांवर रायफली ताणून थेट गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जमिनीवर कोसळले आणि जागीच मरण पावले. दोघेही दौंड, पुणे येथील एसआरपीएफ कॅम्पचे जवान आहेत. घटना घडल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami