पुणे – पुणे शहरातील चांदणी चौक प्रकल्पाच्या कामाला दिवाळीनंतर पुन्हा वेग आला असून काल सोमवारी मध्यरात्रीपासून खोदकामासाठी स्फोट करण्यास प्रारंभ करण्यात येत आहे.आता एक दिवसाआड मध्यरात्री १२.३० वाजता अर्धा तास वाहतुक थांबवून खडकांमध्ये नियंत्रित स्फोट घडवुन आणले जाणार आहेत.
चांदणी चौकातून जुना पूल पाडल्यानंतर त्यालगतचे खडक फोडण्यास प्राधान्य देण्यात आले.त्यासाठी दिवसाआड मध्यरात्री साडेबारा वाजता अर्धा तास वाहतूक थांबवून खडकामध्ये नियंत्रित स्फोट घडवून आणले जातात. ते दगड अन्यत्र हलविले जातात. त्याद्वारे महामार्गाच्या लेन वाढविण्यात आल्या. महामार्गावर मुंबईकडून सातार्याकडे जाण्यासाठी पाच लेन, तर सातार्याकडून मुंबईला जाण्यासाठी तीन लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या बर्याच प्रमाणात सुटली आहे.चांदणी चौकात पूर्वी चार लेन असल्यामुळे तेथे अनेक वर्षे वाहतूक कोंडीची समस्या होती. तेथे सध्या ९ लेन उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी सेवा रस्त्यांसह १४ लेन असतील. त्या वेळी महामार्गासाठी सहा लेन, तर दोन्ही बाजूला सेवा रस्त्याच्या प्रत्येकी चार लेन करण्यात येणार आहेत. येत्या दीड महिन्यांत ते काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान,कोथरूडकडून वारजेकडे जाणार्या सेवा रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत तो वाहनचालकांना वापरासाठी खुला होणार आहे.