संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

पुण्याच्या सेवा विकास बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आर्थिक संकटात सापडल्यामुळे डबघाईला आलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्यता नसलेल्या पुण्यातील सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला. त्यामुळे आजपासून बँक बंद झाल्याने दिवाळीच्या तोंडावर बँकेच्या खातेदार व ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे. त्यांना आता पैसे काढता येणार नाहीत.
सेवा विकास सहकारी बँक लिमिटेकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. मोठ्या प्रमाणावर कर्जे थकल्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. नजीकच्या काळात ती या संकटातून बाहेर पडण्याची आणि तिच्या कमाईची शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन सोमवारी १० ऑक्टोबरला बँकेचे व्यवहार बंद झाल्यानंतर तिचा परवाना रद्द केल्याचे आणि मंगळवारपासून संपूर्ण व्यवहार बंद केल्याचे जाहीर केले. या बँकेकडे १४ सप्टेंबरपर्यंत विमा उतरवलेल्या १५२.३६ कोटींच्या ठेवी होत्या. ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ठेवीदारांना त्या परत करणार आहे. म्हणजे बँकेच्या ९९ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवींचे पैसे परत मिळणार आहेत. तथापि दिवाळीच्या तोंडावर बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे बँकेचे ठेवीदार आणि खातेदार अडचणीत सापडले आहेत. पैसे बँकेत अडकल्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत, हा त्यांच्यासाठी दिलासा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami