संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुण्याच्या शिरुर तालुक्यातील ‘ तो ” नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील जांबूत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर ‘ तो ” नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला.१० दिवसांपूर्वी याच बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका १९ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन करत बिबट्याला पकडण्याची मागणी केली.
या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या परिसरात १५ पिंजरे लावले होते.अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर आज शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले.दहा दिवसांपूर्वी जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या याच बिबट्याने पूजा नरवडे या १९ वर्षीय तरुणीला फरफटत उसाच्या शेतात २०० फुट अंतरापर्यंत ओढत नेले होते. लोकांचा आरडाओरडा झाल्यानंतर बिबट्याने पलायन केले होते. मात्र मानेला खोल जखम झाल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला होता. याठिकाणची ही दुसरी घटना आहे.दरम्यान,या परिसरात बिबट्याची संख्या मोठी असल्याने वनविभागाने इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami