संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

पुण्याच्या वाफगावात २ गटांत तुंबळ हाणामारी! ३ जबर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राजगुरूनगर – पुण्याच्या खेड तालुक्यातील वाफगावात अतिक्रमण काढण्यावरून २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यात एका गटाच्या १७ जणांनी दुसऱ्या गटाच्या ३ कुटुंबांना घरात घुसून लाठी-काठ्यांनी झोडपून काढले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाणामारीत ३ जण जबर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
राजगुरुनगर जवळच्या वाफगावात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भागवत आले होते. तेव्हा नितीन कराळे, सुरेश कराळे आणि स्वाती कराळे यांचे अतिक्रमण हटवण्यावरून दोन्ही गटांत वाद झाला. नंतर भागवत गटाच्या १७ जणांनी कराळे गटाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यात नितीन कराळे गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुण्याच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर अजय भागवतसह १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते सर्वजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami