पुणे- पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणाधारा सोसायटीत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, तीन ते चार फ्लॅटमध्ये ही आग पसरली. दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 फायरगाड्या आणि 1 पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर अग्निशमनच्या जवानांनी सोसायटीमधील फ्लॅटमध्ये अडकलेल्या आठ नागरिकांची सुखरुप सुटका केली. उशिरापयर्र्ंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.