संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

पुणे-सोलापूर हायवेवर अपघात
तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पुण्यातील चौफुला येथे पुणे सोलापूर मार्गावर लक्झरी बसचा अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात घडला. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात जखणी झालेल्या १५ प्रवाशांना यवत, केडगाव, आणि पुण्यामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूरहून एक खासगी ट्रॅव्हल बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ एका ट्रकचा टायर फुटल्यामुळे तो रस्त्यांच्या बाजूला उभा केला होता. बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि मागच्या बाजूने ही बस जाऊन धडकली हा अपघात एवढा भीषण होता की, यात बसचा चक्काचूर झाला. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या