संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

पुणे महापालिकेचे विभाजन करा ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणे महापालिकेचे विभाजन करा,अशी मागणी उच्च, तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.त्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,पुणे महापालिकेचे क्षेत्र वाढत आहे.आधी यामध्ये ११ गाव समाविष्ट केली होती. त्यानंतर पुन्हा २३ गाव समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील कोणत्याही महापालिकेपेक्षा मोठे झाले आहे.या समाविष्ट गावातील नागरिकांना सोयी-सुविधा द्यायच्या असतील,तर पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची गरज आहे. पाटील म्हणाले, पुणे हे सुरक्षित शहर आहे. त्यामुळे जितके युनिट लहान तितका त्यांचा विकास लवकर व सहज होतो.त्यामुळे पुणे महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे.यावेळी मंत्री पाटील पुढे म्हणाले की, माध्यम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे पत्रकारांना २४ तास काम करावे लागत आहे.अलीकडे पत्रकारांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.याची दाखल घेवून पत्रकारांचे ‘ड्यूटी आवर्स’ ठरवण्याची गरज आहे. तसेच त्यांना स्थैर्य देण्यासाठी ही पत्रकारांच्या संघटनांनी काम करणे गरजेचे आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami