मुंबई – होळी सणासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत.याच होळी सणानिमित्त होणार्या प्रवाशांच्या जादा गर्दीमुळे मध्य रेल्वेने चार साप्ताहिक सुपरफास्ट विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.यात पुण्याहून बिहारमधील बरौनीसाठी ११ मार्च ते १८ मार्च दरम्यान चार होळी विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत.
यामध्ये गाडी क्रमांक ०५२८० ही साप्ताहिक विशेष ट्रेन ११ ते १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सुटणार असून ही गाडी दुसर्या दिवशी दुपारी दीड वाजता बरौनी येथे पोहचेल.तसेच ९ मार्च ते १६ मार्च रोजी गाडी क्रमांक ०५२७९ ही गाडी दुपारी १२.१० वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री १०.३० वाजता पुण्याला पोहचेल.या गाड्या दौंडमार्गे नगर,कोपरगाव, मनमाड,भुसावळ,खंडवा, इटारसी,जबलपूर,कटनी, सतना,माणिकपूर,प्रयागराज
तसेच पुढे हाजीपूर,समस्ती या स्थानकांवर थांबेल.उद्या २६ फेब्रुवारीपासून सर्व तिकीट आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.com. in या वेबसाईटवर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू होणार आहे.