संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

पुणे आणि पिंपरीतही आता
डबल डेकर बस धावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही आता इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार आहे. या प्रस्तावाला पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानूसार पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात डबल डेकर बसबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. पीएमपीएल कार्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळच्या बैठकीत 100 डबल डेकर बसखरेदीबाबत शिक्कामोर्तब झाल्याने या चर्चेला पूर्णविराम दिला. पहिल्या टप्प्यात महापालिका आणि पीएमपी प्रशासन 20 इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार आणि पीएमपीतील विभाग प्रमुख उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात 100 पैकी 20 डबल डेकर बस खरेदी केल्यानंतर याचे 60-40 नुसार वाटप करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे हद्दीत 12 डबल डेकर बस तर पिंपरी-चिंचवड हद्दीत 8 बस धावणार धावतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या