संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पुणेकरांना मिळणार
एकदिवसाआड पाणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून येत्या सोमवारपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. चारही धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या जलसंपदा विभागाने नागरिकांना आवाहन केले होते की पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला. सदर बैठकीत त्यांनी पुणे शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने शहरात सोमवारपासून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून सोमवारपासून अंमलबजावणी करावी, अशी चर्चा बैठकीत झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे शहरात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍यां धरण क्षेत्रात पाऊस पडलेला नाही. चारीही धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पाऊस असाच लांबीवर पडला तर नागरिकांच्या समस्यांमध्ये अधिक भर पडेल. गेल्यावर्षी या काळात 26 टीएमसी पाणीसाठा चारही धरणांमध्ये शिल्लक होता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ 14 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून पुणे महापालिका त्याचे नियोजन करणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami