संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुढील महिन्यात भारत दौऱ्यावरयेणार सौदीचे युवराज सलमान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. हा त्यांचा काही तासांचा दौरा असून त्यानंतर ते इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या जी-२०शिखर परिषदेसाठी रवाना होतील. त्यावेळी ते पंतप्रधान मोदींना भेटतील.
वेळापत्रकानुसार मोहम्मद बिन सलमान १४ नोव्हेंबरला सकाळी भारतात पोहोचतील आणि नंतर निघतील.सौदी राजकुमार यांची ही भेट पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामार्फत पाठवलेल्या निमंत्रण पत्रानंतर होत आहे. बिन सलमान यांच्या भारत भेटीपूर्वी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल अझीझ यांनी भारताला भेट दिली. ओपेक प्लस संघटनेच्या तेल उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयानंतर त्यांची भेट झाली होती. यावेळी त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, तेल मंत्री हरदीप सिंग पुरी आणि उर्जा मंत्री आरके सिंह यांची भेट घेतली होती.पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ मध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांनी अनेक करार आणि प्रकल्पांची घोषणा केली होती.त्या प्रकल्पांच्या कामाबद्दल आढावा या दौर्‍यावेळी घेतला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami