संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

पीएफच्या व्याजदरात कपात! ४४ वर्षांच्या निचांकाची नोंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- पीएफच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजदरात सरकारने यंदा ०.४० टक्के कपात केली आहे. त्यामुळे २०२१-२२ या वर्षात पीएफवर ८.१ टक्के व्याज मिळणार आहे. ४४ वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. याचा फटका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ५ कोटी खातेदार कामगारांना बसणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पैशांवर २०२१-२२ या वर्षीचा व्याजदर ठरवण्यात आला. ८.१ टक्के व्याजदराला सरकारने मंजुरी दिली. गेल्यवर्षी हा व्याजदर ८.५० टक्के होता. म्हणजे यंदा त्यात ०.४० टक्के कपात झाली. कामगार मंत्रालयाने व्याज दराचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवला होता. त्याला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली. यापूर्वी १९७८ मध्ये पीएफवर ८ टक्के व्याजदर होता. आता ८.१० टक्के व्याजदर झाल्यामुळे त्याने ४४ वर्षांचा निचांक नोंदवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami