संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

पीएफआयच्या संशयित फरार कार्यकर्त्यास नांदेडमध्ये अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – नांदेडमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने फरार संशयित आरोपी पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या मोहम्मद आबेद अली महेबूब अली या कार्यकर्त्याला देगलूर नाका भागातून अटक केली आहे. यापुर्वी पीएफआयच्या चाैघांना अटक करण्यात आली हाेती.

पीएफआयच्या मोहम्मद आबेद अली महेबूब अली या कार्यकर्त्याला देगलूर नाका भागातून अटक करण्यापुर्वी एनआयएने दिलेल्या सुचने नुसार एटीएसने नांदेडहुन मिराज अन्सारी या कार्यकर्त्याला तर परभणीतून चार जणांना अटक केली होती. हे पाचही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.दरम्यान अटक केलेल्या मोहम्मद आबेद अलीला न्यायालयात हजर करण्यात आले.टेरर फंडींग प्रकरणात एनआयए आणि एटीएसने देशभरात छापेमारी करण्यात आली. ही कारवाई पुढे सुरूच असल्याचे दिसते. एनआयएच्या कारवाई विरोधात पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने करत कारवाई चुकीची आहे अशी निवेदन दिली होती मात्र, तरीही एनआयएची कारवाई सुरूच आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami