संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पीएफआयचे ट्विटर अकाउंट बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्रालयाने 5 वर्षांची बंदी घातल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली असून गृहमंत्रालयाच्या सुचनेनंतर ट्विटर इंडियाने ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर एनआयए, सर्व राज्यांचे पोलीस आणि एजन्सींनी पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएफआयला 5 वर्षांसाठी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले. पीएफआय व्यतिरिक्त 8 संलग्न संस्थांवरही कारवाई करण्यात आली. आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या तक्रारीनंतर ट्विटर इंडियाने पीएफआयचे ट्विटर अकाउंट बंद केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami