मुंबई :- पंजाब नॅशनल बँक प्रकरणात अटकेत असलेल्या एकमेव महिला आरोपीला अखेर पाच वर्षांनी जामीन मिळाला आहे. नीरव मोदीच्या कंपनीची माजी पदाधिकारी कविता मानकीकरला विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी जमीन मंजूर केला आहे. साल २०१८ मध्ये मानकीकर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. ज्यावर पाच वर्षांनी निकाल देण्यात आला.
विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी मानकीकरचा जामीन मंजूर केला. महिला असूनही रात्री आठ वाजल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी त्यांची अटक बेकायदा ठरवली होती. मात्र आवश्यक कायदेशीर प्रक्रियेद्वारे सीबीआयला पुन्हा त्यांना अटक करण्याची मुभा दिली. मात्र सीबीआयने त्यांना पुन्हा कधीच अटक केली नाही. खटल्याच्या सुनावणीवेळी नियमितपणे कोर्टात उपस्थित राहत असल्याचा दावा मानकीकरने जामीन अर्जात केला होता. यावेळी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एम. मेंजोग यांनी त्यांनी जामिनाची मागणी मान्य केली. मात्र जून २०१८ पासून त्यांचा जामीन अर्ज प्रलंबित होता.
यादरम्यान त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने मानकीकर यांची अटक बेकायदा ठरवत सीबीआयला आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांना पुन्हा अटकेची मुभा दिली. मात्र सीबीआयने त्यांना पुन्हा अटक केली नाही. यावेळी मानकीकर नियमितपणे सुनावणीसाठी उपस्थित असतात. त्यामुळे या प्रकरणाच्या या टप्प्यावर त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळता येणार नाही असे नमूद करत न्यायालयाने कविता मानकीकर यांना जामीन अखेर मंजूर केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह भारतातून पसार झाला. सीबीआयने जानेवारी २०१८ मध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता.