संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पिंपरी-चिंचवडमधील ३५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी – पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील एका ३५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक दिवसांनंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शिवाय कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र मागील १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

यामध्ये काल गुरुवारी ८३९ जणांची तपासणी केली असता २२० पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ६३ हजार ५५३ झाली आहे. तर काल १९५ जणांना डिस्चार्ज दिला असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ५८ हजार २०१ इतकी झाली आहे. तसेच आज एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला ४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेला कोरोनासह अन्य व्याधीदेखील होत्या, असे वैद्यकीय विभागातून सांगण्यात आले. आतापर्यंत ४ हजार ६२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ४५८ सक्रिय रुग्ण आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami