संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पास दाखविल्यानंतरही कोकणात गेलेल्या चाकरमान्यांकडून फास्टॅगद्वारे टोल वसुली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्यासाठी टोलमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. या घोषणेनंतर जारी केलेल्या परिपत्रकात फास्टॅगविषयी स्पष्टता नसल्यामुळे कोकणात गेलेल्या चाकरमांना बसला आहे. फास्टॅगधारकांनी टोलमाफीचा पास दाखविल्यानंतरही टोल वसुली केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्यांना 11 सप्टेंबपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबई बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवरील टोल नाक्यावर गणेशभक्तांकडून टोल आकारला जाणार नाही. टोलमाफी पास असणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनांसाठी ‘गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन` असे स्टिकर्स स्वरूपातील पास देण्यात आले आहेत. मात्र याबाबतच्या परिपत्रकात फास्टॅगबाबत विशेष सूचना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, टोलमाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे सरळ बँक खात्यातून टोलचे पैसे वळते झाल्याचे प्रकार घडत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami