संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पावसामुळे खराब झालेला फ्लॉवरना शिकच्या शेतकऱ्यांनी फेकून दिला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – सतत पडणाऱ्या पावसाचा फटका नाशिकच्या येवला येथील फ्लॉवर पिकाला बसला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी तो उपटून अक्षरशः फेकून दिला. येवल्याच्या रायते येथील शेतकरी शंकर ढिकलेने आई आणि पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरची लागवड केली होती. पावसामुळे तो वाया गेल्याने झालेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. सततच्या पावसामुळे येवला परिसरातील पिकांना मोठा फटका बसला. फ्लॉवरसारखे पीक त्यामुळे वाया गेले. रायते गावातील शेतकऱ्याने मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरची शेती केली. पण पावसामुळे ती वाया गेल्याने आता झालेला खर्च कसा भरून काढायचा. गहाण ठेवलेली मंगळसूत्र कशी सोडवायची हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami