संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पावसाने कापसाच्या वाती झाल्या बीडमध्ये शेतकरी महिलेची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – दिवसभर कापूस वेचला पण वेचलेला कापूसही भिजला.आता घर कुटुंब चालवायचं कस? या विवंचनेतून महिला शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी खळबळजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथे घडली आहे.परतीच्या पावसाने सोयाबीन गेले, कापसाच्या वाती झाल्या, त्यामूळे हतबल झालेले बीड जिल्ह्यातील शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलत आहे.
सविता मुळे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. मयत महिलेचे पती अपंग आहेत.दोन मुलांसह महिला घर चालवत होती,शेती करत होती.मात्र गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू आहे.त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.दोन ते तीन वेळा पाऊस आला.त्या दरम्यान शेतातला कापूस तर भिजलाच, वेचलेला कापूसही भिजला.आता वर्ष कसं घालवायचं ? या चिंतेत आणि नैराश्येतून या शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला आहे.या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami