संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

पाळीव कुत्रा चावला! मालकाला ३ महिने जेल! १२ वर्षांनी ठोठावली शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :- गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका व्यावसायिकाला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या व्यावसायिकाच्या पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीचा चावा घेतला होता. या घटनेच्या तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. अशा आक्रमक कुत्र्यांना बाहेर घेऊन जाताना योग्य ती काळजी घ्यावी. कुत्र्यांमुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि असे प्रसंग जनतेसाठी निश्चितच घातक ठरू शकतात असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला भारतीय दंड संहिता कलम २८९, ३३७ अंतर्गत गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे.

ही घटना २०१० मध्ये घडली होती. नेपियन सी मार्गावर राहणाऱ्या सायरस होर्मसजी यांच्याकडे रॉटविलर आणि लॅब्रेडोर या जातीचे दोन श्वान होते. त्यांचा ७२ वर्षीय केर्सी इराणी यांच्याशी संपत्तीच्या मुद्द्यावरून वाद होता. ३० मे २०१० रोजी होर्मसजी त्याच निमित्ताने इराणी यांच्या घरी गेले होते. जाताना कारमध्ये दोन्ही श्वानांना ते घेऊन गेले. होर्मसजी आणि इराणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी रॉटविलर जातीच्या श्वानाने भुंकण्यास सुरुवात केली. त्याच्या रागीट स्वभावाची जाणीव असतानाही होर्मसजी यांनी कारचा दरवाजा उघडला. त्याने थेट इराणींवर हल्ला चढवला. त्यांच्या पायाच्या पोटऱ्या आणि दंडाला ताे चावला. याप्रकरणी इराणी यांनी तक्रार नोंदविली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या