संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

पालिका निवडणुकीत “आप’ची उडी! दिल्लीतील रणनितीचा वापर करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात घमासान सुरू असताना आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिल्लीची रणनीती वापरली जाणार आहे. मोफत पाणी आणि सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मुंबईकरांना देण्यासाठी आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपने अभ्यास व हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात शिवसेना आणि भाजपत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक जिंकण्याचे दावे-प्रतिदावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. त्यासाठी प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. असे असताना आपनेही पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व २२७ जागा आप लढवणार आहे. त्यासाठी दिल्लीचे मॉडेल वापरले जाणार आहे. नागरिकांना मोफत पाणी आणि चांगल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आपचे कार्यकर्ते अभ्यास करत आहेत. आपचे काम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा आखला आहे. त्यातून कार्यकर्ते घराघरात पोहोचतील, असे आपचे मुंबई कार्याध्यक्ष द्विजेनरा तिवारी यांनी सांगितले. मुंबईच्या प्रत्येक प्रभागात वेगवेगळे प्रश्न आहेत. ते समजून घेतले जातील आणि काम केले जाईल. दिल्लीत शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती मुंबईकरांना दिली जाईल. किती आणि कोणाला मोफत पाणी द्यायचे, बेस्ट मोफत प्रवास कोणाला द्यायचा. याचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami