संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! यंदा २२,५०० रुपये दिवाळी बोनस जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२,५०० रुपये बोनस जाहीर झाला आहे . त्यामुळे यंदा १ लाख २ हजार पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल पालिका कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता.त्या अगोदर केवळ १५ हजार रुपयेच बोनस दिला जात होता पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे गेल्या वर्षी २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्यामुळे या वर्षी त्यांनी २५ ००० रुपये बोनस मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी पालिका कर्मचारी समन्वय समिती आणि पालिका आयुक्त यांच्यात बैठकही झली होती . त्या बैठकीत पालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा २० हजार रुपये बोनस देण्याचे मान्य केले होते. पण पालिका कर्मचाऱ्यांना ते मान्य नव्हते त्यामुळे पालिका कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली . त्यानंतर मुख्यमंत्रयंबरोबर झालेल्या बैठकीत २५०० ० हजार ऐवजी २२५०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले त्यानुसार या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २२,५०० रुपये बोनस दिला जाणार आहे तसेच आरोग्य सेविकांनाही एक पगार दिवाळी भेट म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडं होणार आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami