संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना! कोविड सेंटर पुन्हा सज्ज होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. विशेषत: मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांनी दिवसागणिक ३०० चा टप्पा ओलाडला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना तसेच निर्देश दिले आहेत.

विशेष बाब म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाट येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असा इशारा दिला होता. आता पावसाळा जवळ आल्याने येणाऱ्या काळ्यात कोरोना लक्षणांच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसेल.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत.१. कृपया युद्धपातळीवर चाचणी ताबडतोब वाढवा, प्रयोगशाळांना सक्रिय आणि पूर्ण कर्मचारी कार्यरत ठेवण्याचे आदेश द्या 2. 12-18 वयोगटातील लसीकरण मोहीम आणि बूस्टर डोस आता अधिक तेजीने देणं आवश्यक आहे. 3. जंबो फील्ड हॉस्पिटल्समध्ये पुरेसा कर्मचारीवर्ग आणि सध्या सतर्क राहणे आवश्यक आहे. 4. वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूमच्या स्थितीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज राखली जाईल . 5. खाजगी रुग्णालयांनी सतर्कता बाळगली पाहिजे. 6. येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो प्राधान्याने वापरण्यात येईल. 7. प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे ठोस अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami