संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पालघर तालुक्यातील ८३ उपसरपंचांचीनिवड २५,२७ आणि २७ ऑक्टोबरला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर काही ग्रामपंचायत निवडणुका १६ आणि १७ ऑक्टोबरला पार पडल्या होत्या.यावेळी थेट सरपंच आणि सदस्य निवडले गेले.मात्र उपसरपंच निवडले गेले नव्हते.त्यात पालघर तालुक्यातील ८३ गावातील उपसरपंचाचा समावेश होता. आता या निवडणुका २५,२७,२८ ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणार आहेत.

तालुक्यातील या उपसरपंच पदाची निवड निवडून आलेल्या समस्यांमधून बहुमताने केली जाणार आहे.उपसरपंचांची निवडणूक घेण्यासाठी अभ्यासी अधिकारी म्हणून नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे,नामनिर्देशन पत्राची छाननी करणे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत संपूर्ण प्रक्रिया अभ्यासी अधिकारी यांनी करायची आहे.या निवडणुकांचा कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

पालघर तालुक्यात २५ ऑक्टोबर रोजी दांडी, शिगाव-खुताड, दापोली, दातिवरे,नेवाळे-राणीशी गाव, टेन-टाक वाहाळ, वाढीव सरावली,नांदगाव तर्फ तारापूर,महागाव, घीवली तर २७ ऑक्टोबर रोजी सफाळे,बऱ्हाणपूर, कुंभवली,सातीवली,मान, नवापूर, नंडोर, देवखोप, शेलवाली, उंबरोळीसह २३ ग्रामपंचायती आणि २८ ऑक्टोबर रोजी मनोर, बोईसर,पास्टर,तारापूर, केळवा,मुरबेसह ३४ ग्रामपंचायतींमधील उपसरपंचांची निवडणूक होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami