संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

पालघरजवळ २ एसटी बसच्या टक्करीत ८ प्रवासी जबर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – विक्रमगड-जव्हार रोडवरील वाळवंडा येथे २ एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात दोन्ही बसच्या दर्शनी भागांचा चुराडा झाला. बसचे पत्रे कागदाप्रमाणे फाटले. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी जव्हारच्या पतांगशहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
एसटीची एक बस पालघरहून जव्हारकडे जात होती. तर दुसरी बस जव्हार येथून ठाण्याला निघाली होती. या दोन्ही बस विक्रमगड-जव्हार रोडवरील वाळवंडा गावाजवळ आली तेव्हा भरधाव वेगात असलेल्या दोन्ही बसवरील चालकांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. जव्हारवरून निघालेली बस १० किलोमीटरवर गेल्यावर हा अपघात घडला. त्यात बसमधील ८ प्रवासी जखमी झाले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे सुरक्षित रस्ते प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami