संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

पानसरे हत्याप्रकरणी मुंबईत ‘जवाब दो’ मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्षे होऊन गेली, परंतू तपास पुढे गेला नाही. या प्रकरणावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० फेब्रुवारीला बांद्रा येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा,खेरवाडी,महापालिका मोटर लोडर नाका येथे दुपारी २.३० वाजता हा मोर्चा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात समविचारी संघटनांनी सामील होण्याचे आवाहन कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आले आहे.

नरेंद्र दाभोलकर,कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करणारी सनातनी प्रवृत्ती आजही समाजात दहशत माजवत आहे. दुही पसरवण्याचे काम आहे. सत्ताधारी या प्रवृत्तीला रोखत नाहीत. त्यांना पाठीशी घालत आहेत. सरकारने अजून हत्येस जबाबदार असणाऱ्यांना का पकडले नाही? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विचारण्यात आला. कॉ. गोविंद पानसरेंच्या स्मृतिदिनी राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या