संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

पाथर्डी घाटात एसटी बसचा अपघात ११ प्रवासी जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा :- जिल्यातील मेहरकर बस स्थानकाहून खामगावकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला आज पाथर्डी घाटामध्ये अपघात झाला. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला असून सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

मेहकरवरून खामगावकडे जात असलेल्या बसचा पाथर्डीच्या घाटामध्ये अपघात झाला. त्यावेळी बस रस्त्याकडील झाडाला धडकली. या बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका पोहोचली आणि त्वरित मदतकार्याला सुरु केले. त्याचप्रमाणे गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या