अहमदनगर- भारतीय क्रिकेट बोर्डमार्फत 2022-23 मध्ये होणार्या महिला टी-20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा रणजी महिला सिनिअर संघ नुकताच जाहीर झाला आहे. या संघामध्ये केदार हिची पुन्हा एकदा निवड झाली आहे. गेल्यावर्षी केदार हिने पंधरा विकेट्स घेऊन देशात अव्वलस्थान पटकावले होते. या निवडीमुळे पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शेतकर्याच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर आयपीएल महिला टी-20 क्रिकेटमध्ये धडक मारली होती. आयपीएलसाठी निवड झालेली आरती केदार हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात एस वी नेट अकॅडमी मधून आयपीएलमध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे. आरतीचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण पाथर्डीतील एम. एम. निन्हाळी विद्यालयात झाले. महाराष्ट्रकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. पाथर्डीच्या ग्रामीण भागातील मुलींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र रणजी संघ अशी नेत्रदीपक कामगिरी करत आहे, भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व नक्की करणार असे प्रतिपादन विद्यालयाचे शिक्षक व क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक शशिकांत निराळी यांनी केले.