संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पाणीपुरवठा ठप्प झाल्याने डेक्कन, शिवाजीनगरच्या नागरिकांचे हाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – वारजे येथील पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आज सकाळी कोथरूड, डेक्कन आणि शिवाजीनगर या भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सकाळीच येथील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाले. त्यात नोकरदार आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वारजे पंपिंग स्टेशनला काही दिवसांपासून वीज पुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी त्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुण्याच्या कोथरूड, डेक्कन आणि शिवाजीनगर परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याची घाई असलेल्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. सकाळीच पाणी गेल्याने नागरिक हैराण झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami