संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

पाकिस्तानात महागाईचा उच्छाद
व्याज दर १७ टक्क्यांवर पोहचला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कराची- पाकिस्तानात आर्थिक संकट दिवसानुदिवस वाढताना दिसत आहे. अशातच स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने सोमवारी बेंचमार्क व्याज दर १०० बेस पॉइंट्सने वाढवून १७ टक्क्यांवर नेला आहे. जो ऑक्टोबर १९९७ नंतरचा उच्चांक आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सेंट्रल बँकेने सप्टेंबर २०२१ पासून बेंचमार्क व्याजदर १०० बेस पॉईंट्सने वाढवला आणि एकूण वाढ १,००० बेसिस पॉइंटवर नेली. एसबीपी गव्हर्नर जमील अहमद यांनी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या पतधोरण पत्रकार परिषदेत खुलासा केला की, “महागाईचा दबाव कायम आहे आणि तो व्यापक आहे. हे व्याज दर अनियंत्रित राहिल्यास त्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधीसाठी उच्च चलनवाढीची अपेक्षा ठेवू शकतात. त्यामुळे चलनविषयक धोरण समितीने यावर जोर दिला की, भविष्यातील शाश्वत वाढीला पाठिंबा देण्यासाठी महागाईच्या अपेक्षा स्थिर करणे आणि किंमत स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे.” असे गव्हर्नर यांनी सांगितले.
पाकिस्तानने जागतिक बँकेकडे आर्थिक मदत मागितली
पाकिस्तानमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. तेथे एक रुपया डॉलरच्या तुलनेत २२९.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी चलनाच्या मूल्यात १२ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि सोन्याचा साठाही त्याच दराने कमी होत आहे. यातच अडचणीच्या काळात पाकिस्तान सातत्याने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अनेक देशांकडे आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जागतिक बँकेने त्याला दणका दिला आहे. जागतिक बँक पाकिस्तानला १.१ अब्ज डॉलरचे कर्ज देणार होते. मात्र त्यांनी आपला हा निर्णय तात्पुरती मागे घेतला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami