पेशावर:- पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मंगळवारी कारला धडक देऊन बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गिलगिट बाल्टिस्तान भागातील दिआमीर भागातील शतियाल चौकाजवळ हा अपघात झाला. गिलगिटहून रावळपिंडीकडे जाणाऱ्या एका बसची कारला धडक बसली आणि दोन्ही वाहने खोल दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेत झालेल्या मृत्यू झालेल्या नागरिकांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. या अपघात जखमी झालेल्या रुग्णांना योग्य उपचार देण्याचे निर्देश त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही या अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.