संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अटक होण्याची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पाकिस्तानची तपास संस्था फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलाला १४ अब्ज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कधीही अटक होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे पुत्र आणि पाकिस्तानसातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलाला १४ अब्ज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कधीही अटक होऊ शकते. पुढील तपासासाठी पीएम शहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना अटक करण्याची विनंती एफआयएने न्यायालयाला केली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनाला ११ जूनपर्यंत मुदतवाढ दिली.

दरम्यान, एकूणच याप्रकरणी एजन्सीला आरोपींच्या अटकेची आवश्यकता आहे का? या विशेष केंद्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एफआयए अभियोक्ता म्हणाले की आम्हाला पुढील तपासासाठी त्यांच्या अटकेची आवश्यकता आहे.तथापि, वकील अमजद परवेझ यांनी युक्तिवाद केला की एफ आयए न्यायालयाची दिशाभूल करत आहे, कारण दोघेही तपासाचा भाग होते. त्यांना तुरुंगात डांबणे हा मागील सरकारचा अजेंडा होता. अधिवक्ता अमजद परवेझ यांच्या युक्तिवादानंतर, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ११ जूनपर्यंत तहकूब केली आणि शेहबाज शरीफ आणि हमजा शेहबाज या दोघांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली. एफआयएने नवीन अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने सुलेमान शेहबाज, ताहिर नक्वी आणि मलिक मकसूद यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. वॉरंटचे पालन सुनिश्चित करण्याचे आणि पुढील सुनावणीच्या तारखेला अहवाल सादर करण्याचे निर्देश एफआयएला दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami