संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पहिली महिला आयपीएल मार्चमध्ये होणार! बीसीसीआयची तयारी सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुरुष क्रिकेटप्रमाणे महिला क्रिकेटला प्रोत्साहन देत नाही, अशी टीका सर्वच स्तरातून होत आहे. त्यामुळे बीसीसीआयने पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग (डब्ल्यूआयपीएल) मार्च २०२३ मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंडळाने जोरदार प्रयत्न आणि हालचाली सुरू केल्या आहेत. मार्चमध्ये शक्य झाले नाही, तर सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आतापर्यंत महिला टी-२० चॅलेंज ३ संघांमध्ये खेळली जात होती. तर महिला आयपीएल ६ संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना जास्त सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मार्च २०२३ मध्ये पहिल्या महिला आयपीएल क्रिकेटचे आयोजन करण्यावर चर्चा केली. त्यासाठी संघांची फ्रॅंचाईजी आणि इतर बाबींचा आढावा घेतला. मार्चमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यावर मंडळाचा विचार आहे. मात्र सप्टेंबर हा दुसरा पर्यायही बीसीसीआयसमोर आहे. मार्चमध्ये काही अडचण आल्यास महिला आयपीएल सप्टेंबरमध्ये खेळवली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने पुण्यात महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी स्टेडियममध्ये सामन्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पहिल्या महिला आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami