संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पहिली पत्नी असताना मुस्लिम पुरुष दुसरा निकाह करू शकत नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प्रयागराज : मुस्लिम समाजात बहुपत्नीत्व प्रथा असली तरी अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाने इस्लाम धर्मग्रंथ कुराणचा दाखला देत मुस्लिम व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करू नये, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबतचे वृत्त असे की, आपली पहिली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करण्यात जर कोणी मुस्लीम पुरुष सक्षम नसेल तर पवित्र कुराणाच्या अनुसार तो दुसऱ्या महिलेशी निकाह करू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहबाद उच्च न्यायालयाने केली आहे.

अजीजूर रहमान याने दुसरा विवाह केला होता आणि त्याची कल्पना पहिली पत्नी हमीदुन्निशा हिला दिली नव्हती. त्याला दोन्ही पत्नींसोबत राहायचे होते. पण हमीदुन्निशाने नकार दिला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हमीदुन्निशा हिला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पतीसोबत राहण्याचा आदेश देण्यास संत कबीर नगर येथील कौटुंबिक न्यायालयाने नकार दिला होता. यासंदर्भातील अजीजूर रहमान याची आव्हान याचिका फेटाळत अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. न्यायमूर्ती एस. पी. केसरवानी आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.कुराणमधील सूरा ४ आयत ३ चा संदर्भ न्यायालयाने दिला. यात दिलेला धार्मिक आदेश सर्व मुस्लीम पुरुषांवर बंधनकारक आहे. विशेषत:, सर्व मुस्लीम पुरुषांना त्यानुसार अनाथांशी न्यायाने वागणे बंधनकारक आहे. मग ते आपल्या आवडीच्या दोन, तीन किंवा चार स्त्रियांशी निकाह करू शकतात. पण मुस्लीम पुरुष आपल्या पहिल्या पत्नीची, मुलांची काळजी घेण्यास सक्षम नसेल तर तो पवित्र कुराणच्या उपरोक्त आदेशानुसार दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच जेथे महिलांचा सन्मान होत नाही, तो समाज सुसंस्कृत म्हणता येणार नाही. महिलांचा आदर करणाऱ्या देशालाच सुसंस्कृत देश म्हणू शकतो. मुस्लिमांनी एक पत्नी असताना दुसरे लग्न करणे स्वत:हूनच टाळले पाहिजे. खुद्द पवित्र कुराणच पहिल्या पत्नीला न्याय देऊ न शकणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला दुसऱ्या लग्नाची परवानगी देत ​​नाही, असे सांगून पहिल्या पत्नीला कल्पना न देता, त्या व्यक्तीने केलेला दुसरा निकाह म्हणजे, पहिल्या पत्नीशी क्रूर व्यवहार केल्यासारखेच आहे,अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami