पणजी- गोव्यातील पर्यटकांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन येथील सरकारने एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की पर्यटकांसोबत छायाचित्रे काढण्यापूर्वी किंवा त्यांचे एकटे फोटो काढण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. यामुळे पर्यटकांच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल.गोव्यात खुल्या ठिकाणी स्वयंपाक करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. असे केल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्याचबरोबर समुद्रकिनारी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने खडकांवर आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्यास सांगितले आहे.