संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

परभणीत सोयाबीन पिकावर आता लष्करी अळीचा हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी – शेतकऱ्यांच्या पाठीशी संकटांची मालिका सुरूच असून पेरणीत सतत पाऊस त्या पिवळ्या मोझ्याक रोगाचे आक्रमण नंतर महिण्याचा खंड आणि आता लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे उत्पादन अर्धे अधिक घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पेरणीचा खर्च ही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
पिवळा मोझ्याकनंतर २७ दिवस पावसाचा खंड आणि आता याची कमी की काय म्हणून पुन्हा निसर्गाने लष्करी अळी नुकसानीसाठी पाठवल्याचे जिल्हातील शेतशिवारात दिसू लागले आहे. सततचे दमट हवामान, पाऊस या मुळे आता सोयाबीन पिकावर पाने खाणारी लष्करी अळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही अळी सोयाबीन पिकांची संपुर्ण पाने खात असल्याने प्रकाश संश्लेशन क्रिया मंदावते. परिणामी सोयाबीन पिकात दाने भरण्याची क्रिया सुरू असतानाच असाप्रकार समोर आल्याने अजून उत्पादनात घट येणार हे निश्चित ठरलेले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami