परभणी-राज्यभरात सध्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे या रोगाने दगावत आहे.अशातच आता राज्यातील परभणीत एका नव्या रोगाने पाय रोवला आहे.याठिकाणी बैलाची जीभ रक्तस्राव होऊन गळून पडू लागली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
महाराष्ट्रावर सध्या नवीन संकट घोंगावत आहे. लम्पी आजारानंतर शेतकऱ्यांचे पशूधन एका नवीन आजाराने ग्रासले आहे. रात्रीतून बैलाची जीभ रक्तस्राव होऊन गळून पडू लागली आहे.परभरणी येथील सेलूमध्ये हा प्रकार समोर आला आहे.एक दोन नाही तर तब्बल ११ बैलांची जीभ गळून पडल्याचे निदर्शनास आले आहे. हे पाहून पशू चिकीत्सक देखील हैराण झाले असून या आजाराचे निदान लावण्यात अपयश येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.आधीच लम्पी आजार असतानाच हा अनोखा आजार पशूधनाला झाल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. याबाबत बोलताना शेतकऱ्याने सांगितले की, रात्रीतून अचानक रक्त आणि लाळेसह जीभ गळून पडत आहे.पशूवैद्यकीय अधिकाऱ्याला दाखवली असता त्यांनीही आमच्या कारकीर्दीतील नवीनच रोग असल्याचा म्हटले आहे. सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.