संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

परभणीच्या करपरा धरणात बुडून 2 मुलांसह आईचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी- सरपण आणण्यासाठी 30 वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतुर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात काल सायंकाळी 10 वाजता गेली होती. यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास दोन बालकांचे मृतदेह या धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले होते. तर आज सकाळी महिलेचा मृतदेह धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

निवळी बुद्रुक येथील नसरीन रसूल पठाण (30), आयान रसुल पठाण (3), सना रसूल पठाण (दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. जिंतुर तालुक्यातील निवळी येथील नसरीन या सरपण आणण्यासाठी करपरा धरण परिसरात सकाळी दोन बालकांसह गेल्या होत्या. तहान लागल्याने धरणाकाठी पाणी आणण्यासाठी त्या बालकांना घेऊन गेल्या असता त्यांचा तोल गेला व त्या धरणामध्ये बुडाल्या आणि मृत झाल्या. त्यानंतर बोरी पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरु झाले. काल सायंकाळी दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना दिसले. मात्र महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापयर्र्ंत शोधकार्य सुरु होते. यानंतर आज दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य केले असता सकाळी 11 वाजता नसरीन यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami