संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

परप्रांतीयांच्या समस्येमुळे न्यूयॉर्क शहरात आणीबाणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन- न्यूयॉर्कमध्ये आश्रय घेणाऱ्या परप्रांतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यांना सामावून घेण्यास न्यूयॉर्कची निवासी क्षमता संपली आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापौर एरिक ॲडम्स यांनी न्यूयॉर्क शहरात आणीबाणी जाहीर केली आहे. ती ३० दिवस कायम राहणार असून त्यानंतरही वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरून न्यूयॉर्क शहरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आश्रयासाठी येत आहेत. मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी मदत केंद्र बांधली जात आहेत. त्यासाठी काही मानवतावादी संघटना मदत करत आहेत. न्यूयॉर्कची निवारात क्षमता जवळपास ६१ हजारापेक्षा जास्त आहे. आता ती जवळपास १०० टक्के फुल झाली आहे. त्यानंतरही परप्रांतीय नागरिकांचा शहरांमध्ये ओघ सुरूच आहे. त्यामुळे महापौरांनी आणीबाणी लागू केली आहे. परप्रांतीय नागरिकांचा न्यूयॉर्कमधील ओघ असाच कायम राहिला तर पुढील वर्षी शहराची निवारात क्षमता १ लाखावर जाण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून १७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय न्यूयॉर्कमध्ये आले. त्यातील बहुतेक जण दक्षिण अमेरिकेतील आहेत. दक्षिण अमेरिकेच्या सीमेवरून न्यूयॉर्क शहरात ते स्थिरावले आहेत. निर्वासितांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी शहरातील ४२ हॉटेलसोबत आपत्कालीन आश्रयस्थान म्हणून करार केला आहे. परप्रांतीय स्थलांतरांच्या संकटावर मात करण्यासाठी न्यूयॉर्कने चालू आर्थिक वर्षात १ अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित धरला आहे. न्यूयॉर्क गव्हर्नर कार्यालयाबरोबरच मदत केंद्र आणि कर्मचारी संसाधनांसाठी अतिरिक्त ठिकाणे शोधण्याचे काम करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami